Jivala Jivach Daan Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Jivala Jivach Daan Lyrics in Marathi, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Jivala Jivach Daan Lyrics in Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं

साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं

एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं

आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं

आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं

राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं

I hope you liked Jivala Jivach Daan Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Jivala Jivach Daan Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment