De bai de jogwa de lyrics in marathi

In this lyrics article you can read De bai de jogwa de lyrics in marathi, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला De bai de jogwa de lyrics in marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

दे बा‌ई दे जोगवा दे, आ‌ई अंबेचा जोगवा दे ॥धृ॥
मंगळवारचे दिवशी नाही सारवले घर
गुन्हा माफ कर एवढा गुन्हा माफ कर ॥१॥

आ‌ई अंबाबा‌ई तुला घालीन मी स्नान
पाटावर बसवूनी करीन पूजन ॥२॥

आ‌ई अंबाबा‌ई तूझ्या कानामध्ये झुबा
तुझ्या दर्शनाला राजा, कोल्हापूरचा उभा ॥३॥

आ‌ई अंबाबा‌ई तुला नेसवीन पातळ
श्रावणाचा महिना झाला बाळ गोपाळ सांभाळ ॥४॥

आ‌ई अंबाबा‌ई तुझ्या नाकामधे नथ
नथीमध्ये मोती एक हजाराचा एक ॥५॥

आ‌ई अंबाबा‌ई तुझे तळघर खोल
ऐकू येत नाही तुझ्या पुज्याऱ्याचे बोल ॥६॥

आ‌ई अंबाबा‌ई तुझ्या हातामध्ये गेंद
तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद ॥७॥

I hope you liked De bai de jogwa de lyrics in marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला De bai de jogwa de lyrics in marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment