Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती

In this lyrics article you can read Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती, with English Lyrics from category aarti lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

 

श्री हरतालिकेची आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । .
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

I hope you liked Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment