Jahle Bhajan Lyrics In Marathi

In this lyrics article you can read Jahle Bhajan Lyrics In Marathi, with English Lyrics from category bhajan lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Jahle Bhajan Lyrics In Marathi, English Lyrics सोबत bhajan या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

जाहलें भजन आम्ही नामितों तव चरणा, नामितों तव चरणा ||

वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना || धृ ||

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो, देवा तुजलाची ध्यातो ||

प्रेमें करूनियां देवा गुण तुझें गातों || १ ||

तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना ||

रक्षूनियां सर्वा धावि आम्हांसी आज्ञा || २ ||

मागणें ते देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे ||

तारूनियां सकळा आम्हां कृपाद्रष्टी पाहें || ३ ||

जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया, ऐशा या ठाया ||

प्रेमानन्दें लागू तुझी किर्ति गावया || ४ ||

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी, आमुच्या मनी ||

हेची देवा तुम्हां असे नित्य विनवाणी || ५ ||

वारूनियां संकटे आतां आमुची सारी, आतां आमुची सारी ||

कृपेची साउली देवा दीनावरि करी || ६ ||

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी, चिंता तुम्हा असावी ||

सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावि || ७ ||

निरोप घेतो आतां आम्हा आज्ञा असावी |

चूकलें आमचें काही त्याची क्षमा असावी || जाहले |

More Song: Devichi Aarti Marathi Lyrics

#jhale bhajan lyrics

I hope you liked Jahle Bhajan Lyrics In Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Jahle Bhajan Lyrics In Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment