lavthavti vikrala aarti lyrics – Marathi Song Lyrics Online


In this lyrics article you can read lavthavti vikrala aarti lyrics, with English Lyrics from category ganpati songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला lavthavti vikrala aarti lyrics, English Lyrics सोबत ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

lavthavti vikrala aarti lyrics

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

I hope you liked lavthavti vikrala aarti lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला lavthavti vikrala aarti lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा



Source link

Leave a Comment