या पोस्टमध्ये तुम्हाला mahur gadavari aarti lyrics in marathi, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
mahur gadavari aarti lyrics in marathi
माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥
पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार
अंगी चोळी ती हिरवीगार ।
पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥
बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।
काफ बाल्याने कान ही साजे ।
इच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥
सरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ ।
जोडवे मासोळ्या पैंजन चाळ ।
पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥
जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले ।
तुरे हार माळीने गुंफीयेले ।
गळा शोभे तो गं रुप शोभे तो गं । आनंदास ॥ भक्त येती ॥
हिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट ।
हिला जेवायला चांदीचे ताट ।
पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥
मुखी तांबुल पाचशे पानांचा ।
मुखकमली रंग लालीचा ।
खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥
विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला ।
माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी
व्हावे अखंड अखंडीत पावनी
सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥
I hope you liked mahur gadavari aarti lyrics in marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला mahur gadavari aarti lyrics in marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा